पाथरीत ऊस तोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 15:55 IST2019-03-14T15:55:01+5:302019-03-14T15:55:56+5:30
सुनील मारोती दांडगे असे मयत मजुराचे नाव आहे़

पाथरीत ऊस तोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
पाथरी (जि़परभणी)- एका ऊसतोड मजुराने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास लिंबा येथे घडली़
सुनील मारोती दांडगे असे मयत मजुराचे नाव आहे़ तालुक्यातील विटा बु़ येथील ऊसतोड कामगार सुनील दांडगे (३५) हा दिवसभराचे ऊसतोडीचे काम करून मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास लिंबा शिवारातील एका कालव्याच्या बाजुला असलेल्या झाडाजवळ आला़ या ठिकाणी झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाथरी पोलिसांनी पंचनामा केला.
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ माया सुनील दांडगे यांच्या माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ पोलीस निरीक्षक डी़डी़ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार भास्कर बर्गे तपास करीत आहेत़