उसाचे क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST2021-02-25T04:20:50+5:302021-02-25T04:20:50+5:30
वाहतुकीचा खोळंबा परभणी : येथील विसावा कॉर्नर भागात चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. ...

उसाचे क्षेत्र वाढले
वाहतुकीचा खोळंबा
परभणी : येथील विसावा कॉर्नर भागात चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या स्टेशन रोडवरील वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक सुरू केल्यास ही समस्या निकाली निघू शकते. सध्या तरी वाहनधारकांचा त्रास कायम आहे.
सवारी गाड्यांना खो
परभणी : परभणी - मनमाड मार्गावर सवारी रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र रेल्वे प्रशासन याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अद्यापही या रेल्वेगाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना आरक्षण करूनच प्रवास करावा लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जिल्हा परिषद इमारतीचे काम ठप्प
परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागात उभारण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम सध्या ठप्प पडले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. ते अद्यापही पूर्ण झाले नसल्याने जिल्हा परिषद कार्यालयांचे स्थलांतर रखडले आहे.
मास्कची विक्री वाढली
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दोन दिवसांपासून कारवाया सुरू केल्याने शहरी भागात मास्कची विक्री वाढली आहे. बाजारपेठ भागातील रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी मास्क विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत.