शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय सभागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:18 IST2021-03-05T04:18:09+5:302021-03-05T04:18:09+5:30
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे. हा प्रश्न शासनदरबारी प्रलंबित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय सभागृहात
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे. हा प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहे. या अनुषंगाने आ. बाबाजानी दुर्राणी यांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी विधान परिषदेत विशेष उल्लेखाच्या सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले. त्यामध्ये त्यांनी परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देणे आवश्यक आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या अधिकप्रमाणात आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या निकषांमध्ये परभणी बसते. येथे केवळ उपकरणे व तज्ज्ञ आस्थापनेची गरज भासणार आहे. यासाठीच्या निधीचे अंदाजपत्रकही तयार आहे. त्यामुळे मंजुरीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर सभापतींनी शासनाने याप्रकरणी दखल घ्यावी व त्या भागास न्याय द्यावा, अशी सूचना राज्य सरकारला दिली.