कातनेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील प्रा. डॉ. पी.एम. कापसे, डॉ. ए. जी. बडगुजर, डॉ. ए. एम. लाड, डॉ. एस. व्ही. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या अनघा कुलकर्णी, मनीषा चापके, पल्लवी मुके, मोहिनी देशमुख, ऋतुजा कटारे, विद्या शिंदे आदींनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर कृषी विषयक विज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमास बाळासाहेब मोरे, राजू पांचाळ, संजय खंडाळकर, दिलीप चापके, भाग्यश्री आंबटवार, उपसरपंच रामेश्वर चापके, ग्रामपंचायत सदस्य गजानन चापके, बापूराव चापके, शेषराव चापके, महेश वैद्य, सुदामराव चापके, ज्ञानोबा पडोळे, उद्धव चापके आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना दिली तंत्रज्ञानाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST