परभणी शहरातील पेट्रोलपंप २० मिनिटेठेवले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:59 IST2019-02-20T23:59:46+5:302019-02-20T23:59:56+5:30

पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी सायंकाळी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवून आणि सर्व दिवे बंद करून शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली़

Stop the petrol pump in Parbhani city for 20 minutes | परभणी शहरातील पेट्रोलपंप २० मिनिटेठेवले बंद

परभणी शहरातील पेट्रोलपंप २० मिनिटेठेवले बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी सायंकाळी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवून आणि सर्व दिवे बंद करून शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली़
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परभणी शहरातील पेट्रोल पंप चालकांनी बुधवारी सायंकाळी ७ ते ७़२० यावेळेत पंपावरील इंधन विक्री बंद ठेवली़ पेट्रोलपंपावरील सर्व दिवे बंद करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली़ परभणी शहरात १३ पेट्रोलपंप असून, या सर्व पेट्रोलपंपावर अशा पद्धतीने शहीदांना अभिवादन करण्यात आले़ जिंतूर येथेही माजी नगरसेवक मिर्झा करीब बेग यांच्या पेट्रोलपंपावर अशाच पद्धतीने श्रद्धंजली अर्पण करण्यात आली़

Web Title: Stop the petrol pump in Parbhani city for 20 minutes