सोनपेठ येथे दोन दुकानाचे छत फोडून चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 19:39 IST2018-03-09T19:38:52+5:302018-03-09T19:39:33+5:30

सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेसमोरील दोन दुकानांचे छत फोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 

Stolen from the roof of two shops at Sonpeth | सोनपेठ येथे दोन दुकानाचे छत फोडून चोरी 

सोनपेठ येथे दोन दुकानाचे छत फोडून चोरी 

परभणी : सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेसमोरील दोन दुकानांचे छत फोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी संतोष शेटे हे जिल्हा परिषद कन्या शाळेसमोरील त्यांचे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानावरील पञा कापल्याचे लक्षात आले. त्यांनी दुकान उघडून पाहणी केली असता गल्ल्यातील रोख रक्कम 1 हजार दोनशे रूपये चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या शेजारील गजानन लांडे यांचे कपड्याचे दुकानही याच पद्धतीने फोडल्याचे निदर्शनास आले. लांडे यांच्या दुकानातून जवळपास 20 हजाराचा मुद्देमाल गायब असल्याचे प्राथमिक पाहणीतून दिसून आले. या प्रकरणी शेटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संतोष मुपडे हे करत आहेत.

Web Title: Stolen from the roof of two shops at Sonpeth