सेलूत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:53+5:302021-02-24T04:18:53+5:30
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भरणे, अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सर्वसोयींनीयुक्त अशी रुग्णवाहिका मिळावी, सेलू उपजिल्हा ...

सेलूत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू करा
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भरणे, अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सर्वसोयींनीयुक्त अशी रुग्णवाहिका मिळावी, सेलू उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांवरून १०० खाटांपर्यंत विस्तारीकरण करण्याबाबत शासनाकडे पाठवलेला प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे या सर्व प्रश्नाबाबत सेलू तालुका विकास कृती समितीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेतली आहे. डॉ. नागरगोजे यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व समस्या तत्काळ सोडवण्याचे आश्वासन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर याप्रश्नी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, निमंत्रक डाॅ. विलास मोरे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, समन्वयक डी. व्ही. मुळे आदींची उपस्थिती होती.