एसटी बसची चाके सुरू; संचारबंदीने तोट्यात पडते भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST2021-04-07T04:17:57+5:302021-04-07T04:17:57+5:30
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारांचा समावेश आहे. या चार ...

एसटी बसची चाके सुरू; संचारबंदीने तोट्यात पडते भर
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांमध्ये २५० बसेसची संख्या आहे. या बसेस दररोज ९०० बस फेऱ्या करून प्रवाशांची ने-आण करतात. त्यामुळे एसटी बसची चाके हळूहळू सुरू आहेत. राज्यातील इतर एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या बस आगारांमध्ये डिझेलअभावी काही बसेसची संख्या कमी करावी लागत आहे; मात्र परभणी जिल्ह्यात जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असून, जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर वारंवार जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे बसची चाके हळूहळू सुरू आहेत; मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यामध्ये भर पडत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू करणे अपेक्षित आहे.
गत वर्ष तोट्याचेच
परभणी येथील विभागीय नियंत्रण कार्यालय अंतर्गत बसेससह मनुष्यबळाची संख्या पुरेशी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू होऊन एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळते; मात्र गतवर्षी २२ मार्चपासून कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर वारंवार जाहीर करण्यात येणारे लॉकडाऊन व संचार बंदीमुळे एसटी महामंडळाच्या उत्पादनामध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे गत वर्ष ही तोट्याचेच गेल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण मार्गावरील बससेवा बंद
परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारातून नऊ तालुक्यातील प्रवाशांचे ने-आण करण्यात येते मात्र मागील वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने सतर्कता बाळगण्यासाठी वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बस सेवा कोलमडली आहे. परभणी- औरंगाबाद, परभणी- नांदेड या दोन प्रमुख मार्गांसह ग्रामीण भागातील बससेवा मागील अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. ही बससेवा सुरू झाली तर एसटी महामंडळाच्या उत्पादनात मोठी भर पडणार आहे.
दररोजचे नुकसान- ३0 लाख
चालक- ५२९
वाहक- ५१४
ऐकून कर्मचारी- १०४३
रोजच्या फेऱ्या- ८६४864