जिंतूरजवळ भरधाव ट्रकने बाईकस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 16:15 IST2021-09-25T16:14:59+5:302021-09-25T16:15:57+5:30
Accident in Parabhani : चालक जागेवर ट्रक सोडून फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जिंतूरजवळ भरधाव ट्रकने बाईकस्वारास चिरडले
जिंतूर ( परभणी ) : भरधाव ट्रकने बाईकस्वारास चिरडल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अकोली रोडवर घडली. संदीप गोपीचंद सिसोदे असे मृत तरुणाचे नाव आहे.
आज दुपारी सोनापूर येथील संदीप जिंतूरकडे बाईकवरून ( MH 14~ K 1715 ) जात होता. याचवेळी जिंतूरकडे दुध घेऊन जाणाऱ्या ट्रकने ( Mh 17 ~ AG 6042 ) त्याला चिरडले. त्याच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, चालक जागेवर ट्रक सोडून फरार झाला. जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत संदीप जिंतूर येथे गजानन नगरमध्ये राहत होता.