पिंगळगड नाल्यावरील पुलाच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST2021-04-20T04:17:48+5:302021-04-20T04:17:48+5:30
गंगाखेड रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न दोन वर्षांपूर्वी राज्यभरात गाजला होता. त्यानंतर या मार्गासाठी शासनाने २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ...

पिंगळगड नाल्यावरील पुलाच्या कामाला गती
गंगाखेड रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न दोन वर्षांपूर्वी राज्यभरात गाजला होता. त्यानंतर या मार्गासाठी शासनाने २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून रस्त्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या परभणी शहरालगत या रस्त्याचे काम सुरू आहे. याच मार्गावरील पिंगळगड नाल्यावर जुना पूल धोकादायक झाला होता. या पुलाचे कामही हाती घेण्यात आले असून सध्या पूल बांधकामासाठी खोदकाम झाले आहे. एका बाजूने पिलर उभारणीही पूर्ण झाली आहे. हा पूल उभारून झाल्यास या मार्गावरील वाहनधारकांची समस्या दूर होणार आहे. सध्या या कामाला गती आल्याने लवकरच पुलाचे काम पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ब्राम्हणगाव फाट्यापर्यंत चौपदरी रस्ता
गंगाखेड नाक्यापासून ते ब्राह्मणगाव फाट्यापर्यंत चौपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटच्या नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. वाहनधारकांची रस्त्याची समस्या दूर झाली आहे.