शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

गंगाखेड येथे दोन जीपच्या धडकेत सहा प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 4:49 PM

एका प्रवास्याची प्रकृती चिंताजनक

गंगाखेड: नांदेड येथून परळीकडे जाणाऱ्या एका जीपची भरधाव वेगातील दुसऱ्या जीपसोबत जोरदार धडक होऊन सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री पडेगाव पाटीजवळ घडली. जखमींवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी परळी येथील शेख रियाज शेख अजगर अली, शेख अल्ताफ शेख एजाज, शेख अबरार शेख शेख इफ्तेखार, शेख शोएब शेख मुमताज, शेख मुजीब शेख अनिस, चालक सय्यद उमर सय्यद खदीर हे सर्व नांदेड येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून रात्री सर्वजण जीपने ( एम एच ४४ के ९४४४ ) परळीकडे निघाले. दरम्यान, परळी रस्त्यावरील पडेगाव पाटीजवळ मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव जीपने ( एम एच २२ यु ६०५५) त्यांच्या गाडीस धडक दिली. शेख रियाज शेख अजगर अली, शेख अल्ताफ शेख एजाज, शेख अबरार शेख शेख इफ्तेखार, शेख शोएब शेख मुमताज, शेख मुजीब शेख अनिस, चालक सय्यद उमर सय्यद खदीर आदी सहा जण जखमी झाले. 

यातील शेख अबरार शेख शेख इफ्तेखार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. तर उर्वरित जखमींवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मोहंमद यासीन शेख अ. रशीद रा. मलिकपुरा परळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम एच २२ यु ६०५५ या वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार त्र्यंबकराव तानाजी शिंदे हे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल