साहेब, बेडची उपलब्धता करा, सांगा कुठे जाऊ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:38+5:302021-04-19T04:15:38+5:30
जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येत अर्धे रुग्ण परभणी शहरातील आहेत. या रुग्णांच्या सोयीकरिता महानगरपालिकेने मागील दीड महिन्यांपूर्वी वॉर ...

साहेब, बेडची उपलब्धता करा, सांगा कुठे जाऊ ?
जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येत अर्धे रुग्ण परभणी शहरातील आहेत. या रुग्णांच्या सोयीकरिता महानगरपालिकेने मागील दीड महिन्यांपूर्वी वॉर रुमची स्थापना केली आहे. ही वॉर रुम महानगरपालिकेत मागील दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आली. दररोज वॉर रुमकडे किमान ७० ते ८० पेशंटचे वेगवेगळ्या समस्येबाबत फोन येतात. या फोनद्वारे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्येचे निराकरण करण्याचे काम केले जाते. यासाठी तीन डॉक्टर, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्ती केली आहे. ह्यासह एक आरोग्य अधिकारी यांचे नियंत्रण वॉर रुमवर आहे. शहरात दररोज होणाऱ्या अँन्टिजेन, आरटीपीसाआर तपासणीत निघालेले पॉझिटिव्ह रुग्ण महापालिकेच्या वॉर रुमला संपर्क करतात. तसेच दररोजच्या पॉझिटिव्ह पेशंटच्या स्थितीबाबत नियुक्त डॉक्टर त्यांना समुपदेशन करीत औषधी, उपचार याबाबत सल्ला देतात.
हे आहेत वॉर रुमचे क्रमांक
९०४९३५१९९९
९०४९३६१९९९
समन्वयातून काम सुरू
शहरातील अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय या सीसीसी सेंटरमध्ये तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची दिवसभराची आरोग्य स्थिती कशी आहे, गोळ्या-औषधी रुग्ण घेत आहेत का, याची चौकशी केली जाते. तीन डॉक्टर याकामी दिवसभर नियुक्त केले आहेत. महापालिकेच्या १६ वॉर्डच्या वॉर्ड अधिकारी यांच्याशी व जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद, खासगी दवाखाने यांच्याशी समन्वय ठेवत हे काम सुरू आहे.
- डॉ. कल्पना सावंत, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका.
या आहेत रुग्णांच्या मागण्या
तपासणी कुठे करू, टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय करू, टेस्टचा स्कोअर कमी आहे. बेडची उपलब्धता कुठे होईल, ऑक्सिजनचा पुरवठा मिळेल का यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती पेशंट आणि त्यांचे नातेवाईक वॉर रुमकडे करत आहेत.
यांचे वॉर रुमवर नियंत्रण
एक वैद्यकीय अधिकारी, तीन डॉक्टर, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर.
जबाबदारी
दररोज पॉझिटिव्ह पेशंटच्या तब्येतीचा आढावा घेणे, होम आयसोलेशनमधील रुग्णांची औषधांची विचारपूस करणे, औषधी किटचा पुरवठा करणे अशी जबाबदारी वॉर रुममधील नियुक्त डॉक्टर्स नियमितपणे पार पाडत आहेत.
फोन करून केली विचारपूस
मी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत पॉझिटिव्ह पेशंट म्हणून दाखल होतो. त्यावेळी मनपाच्या वॉर रुममधून माझ्या तब्येतीची चौकशी केली जात होती.
- अनिल सुक्ते, परभणी.