शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

‘सरल’ नंतर आता ‘शगून’;  सततच्या आॅनलाईनने शिक्षक झाले त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:16 IST

शालेय विद्यार्थ्यांची माहिती सरल या वेब पोर्टलवर भरण्याच्या कामावरून रणकंदन सुरू असताना आता शालेय विद्यार्थ्यांची माहिती ‘शगून’ या वेब पोर्टलवर भरावी लागणार आहे.

ठळक मुद्देसरलचा अनुभव पाहता शिक्षकांना अध्यापनासह संगणक आॅपरेटरचेही काम करावे लागत असल्याने तालुक्यातील शिक्षकांतून नाराजीचा सूर निघत आहे. केंद्र शासनाने  सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांसाठी शगून नावाचे वेब पोर्टल सुरू केले आहे.

- सत्यशील धबडगे मानवत (परभणी ) : शालेय विद्यार्थ्यांची माहिती सरल या वेब पोर्टलवर भरण्याच्या कामावरून रणकंदन सुरू असताना आता शालेय विद्यार्थ्यांची माहिती ‘शगून’ या वेब पोर्टलवर भरावी लागणार आहे. मात्र सरलचा अनुभव पाहता शिक्षकांना अध्यापनासह संगणक आॅपरेटरचेही काम करावे लागत असल्याने तालुक्यातील शिक्षकांतून नाराजीचा सूर निघत आहे.

देशभरातील शाळांमध्ये होणा-या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती एका क्लिकवर एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने शगून वेब पोर्टल सुरू केले आहे. इतर राज्यांची यशोगाथा, चांगल्या बाबींची माहिती दुस-या राज्यातील जनसामान्यांना मिळावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. केंद्र शासनाने  सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांसाठी शगून नावाचे वेब पोर्टल सुरू केले आहे. ‘श’ म्हणजे शाळा ‘गुण’ गुणवत्ता असे एकत्रीकरण करून हे वेब पोर्टल अंमलात आणले. तालुक्यातील शाळांनी आपल्या तालुक्यातील चांगले उपक्रम या पोर्टलवर अपलोड करावयाचे       आहेत. 

२६ डिसेंबर ते २६ जानेवारी या काळात होणाºया चांगल्या कार्यक्रमांचे व्हिडि   ओ अपलोड करण्याचे आदेश महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेने ५ आॅक्टोबरला जाहीर केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. शाळांमधील विविध बैठका, शिक्षकांचे प्रशिक्षण, स्वरक्षणाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, पालकांची बैठक, साहित्य वाटप, शाळा प्रवेशोत्सव, अध्ययन उपक्रम, विद्यार्थी मंत्रीमंडळ आदी उपक्रमांची माहिती शिक्षकांना या वेब पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. 

एखादा शिक्षक, विद्यार्थी, शिपाई यांनी केलेल्या चांगल्या कामांची माहिती, यशोगाथा या संकेत स्थळावर भरावयाची आहे. एकीकडे सरलचा उडत असलेला गोंधळ त्यानंतर शगूनच्या अतिरिक्त कामामुळे शिक्षकातून नाराजीचा सूर उमटत आहे. नव्या पोर्टलची डोकेदुखी वाढल्याने पोर्टल कार्यान्वित होण्याअगोदरच या पोर्टलच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक शाळेत इंटरनेट सुविधा नसल्याने या पोर्टलवर माहिती कशी अपलोड करावयाची? असा संतप्त सवाल शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. 

रेंज गायबएकीकडे डिजीटल उपक्रमाने शिक्षण विभागात क्रांती घडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना ग्रामीण भागात इंटरनेटची रेंज मिळत नसल्याने सरलची माहिती भरताना शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड  द्यावे लागले होते. आॅनलाईन बदल्या संदर्भात ऐन दिवाळीत शिक्षकांना नेटकॅफेवर दिवस घालवावे लागले होते. आता या शगून वेब पोर्टलवर विविध उपक्रमाची माहिती उपलोड करावयाची आहे. एकूणच शासनाच्या आॅनलाईन प्रक्रियेने शिक्षक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच शासनाने मासिक पाळी संदर्भात शिक्षकांनी जनजागृती करण्याचे आदेशही काढले आहेत. शिक्षकांनी अध्यापन करावे की, उपक्रम राबवावेत, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

पोर्टलची माहिती देऊ शगून वेब पोर्टलबाबतीत आदेश प्राप्त झाले असून लवकरच या पोर्टल संबंधी माहिती शिक्षकांना देण्यात येणार आहे. - संजय ससाणे, गटशिक्षणाधिकारी, मानवत