श्रींची पालखी मंगळवारी परभणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:48 IST2018-07-02T00:47:12+5:302018-07-02T00:48:13+5:30
प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखी सोहळ्याचे ३ जुलै रोजी परभणी शहरात आगमन होणार आहे.

श्रींची पालखी मंगळवारी परभणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखी सोहळ्याचे ३ जुलै रोजी परभणी शहरात आगमन होणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पायदळ वारीने दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जात असतात. या दरम्यान परभणी शहरात तब्बल ३९ दिंड्यांचे आगमन होते. या दिंड्यांची फराळाची व मुक्कामाची व्यवस्था प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी शहरातील श्री रोकड हनुमान मंदिर संस्थानमध्ये करण्यात आली आहे. श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांचा पालखी सोहळा मंगळवारी रोकड हनुमान मंदिरात मुक्कामी राहणार आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिंड्यातील वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी डॉ.रवि भंडारी व त्यांचे पथक करणार आहे. तसेच नागराज मित्र मंडळाच्या वतीने मोफत दाढी व कटींगची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.