दुपारनंतर बंद झाली दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST2021-04-07T04:18:13+5:302021-04-07T04:18:13+5:30
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेत नसणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे ...

दुपारनंतर बंद झाली दुकाने
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेत नसणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील बाजारपेठ भागातील बहुतांश दुकाने सुरूच ठेवण्यात आली. हॉटेल्स, चहा स्टॉल, पान स्टॉल आदी किरकोळ विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केला होता. तसेच बाजारपेठ भागात इतर व्यावसायिकांची दुकाने सुरू होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास मात्र प्रशासनाच्या वतीने शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेली दुकाने बंद करण्यात आली आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार किराणा, फळ, भाजी विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असून त्यानुसार ही दुकाने सुरू राहिली.
इतर प्रतिष्ठाने मात्र बंद ठेवण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर बाजारपेठ भागात काहीसा शुकशुकाट दिसून आला. शहरातील रस्त्यांवर मात्र दिवसभर नागरिकांची वर्दळ कायम होती. दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका वाढल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक विरळ झाली. दिवसभरात वाहतूक आणि इतर व्यवहारांवर कोणताही परिणाम झाला नाही.