धक्कादायक ! परभणीतील जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोनाबाधित कैद्यांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 12:52 IST2020-09-01T12:48:06+5:302020-09-01T12:52:39+5:30

येथील जिल्हा कारागृहातील सुमारे ७० कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Shocking! Three corona positive prisoners escape from Parbhani District Hospital | धक्कादायक ! परभणीतील जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोनाबाधित कैद्यांचे पलायन

धक्कादायक ! परभणीतील जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोनाबाधित कैद्यांचे पलायन

ठळक मुद्देरुग्णालयातील एका हॉलमध्ये १६ कैद्यांवर उपचार सुरू होते.शौचालयाच्या खिडकीचे गज तोडून पलायन केले.

परभणी : कोरोना पॉझिटिव्ह असल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तीन कैद्यांनी खिडकीचे ग्रील तोडून पलायन केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी पहाटे घडली आहे.

येथील जिल्हा कारागृहातील सुमारे ७० कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कैद्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील एका हॉलमध्ये १६ कैद्यांवर उपचार सुरू होते. त्यापैकी तीन कैद्यांनी मंगळवारी पहाटे दीड ते पाच वाजण्याच्या सुमारास शौचालयाच्या खिडकीचे गज तोडून पलायन केले.

पहाटेच्या सुमारास ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पलायन केलेल्या तीन कैद्यांपैकी दोन कैदी खून प्रकरणात तर एक कैदी गांजाची तस्करी केल्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत असल्याची माहिती मिळाली.

Web Title: Shocking! Three corona positive prisoners escape from Parbhani District Hospital