धक्कादायक !दुबार पेरणी करूनसुद्धा सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 19:52 IST2020-08-06T19:40:55+5:302020-08-06T19:52:47+5:30
नैराशेपोटी घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.

धक्कादायक !दुबार पेरणी करूनसुद्धा सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
जिंतूर (जि. परभणी) : तालुक्यातील पाचलेगाव येथील नारायण सुगाजी काळे या शेतकऱ्याने दोन वेळेस सोयाबीनची पेरणी करुनसुद्धा बियाणांची उगवण न झाल्याने हतबल होऊन ४ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील आडूला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
पाचलेगाव येथील नारायण सुगाजी काळे यांना दोन एकर जमीन आहे. त्यांनी यावर्षी या शेतात सोयाबीनची दोन वेळेस पेरणी केली; परंतु, बियाणे निकृष्ट निघाल्याने बियाणांची उगवण क्षमता झाली नाही. त्यामुळे हतबल काळे हे चिंताग्रस्त झाले. नैराशेपोटी त्यांनी ४ आॅगस्टला सायंकाळी ६ वाजता राहत्या घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी शेतातून घरी आल्यानंतर नारायण यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नारायण काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.