शिवसेनेचे खासदार जाधव,आमदार पाटील, वरपुडकरांसह ७ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 19:57 IST2021-09-02T19:55:52+5:302021-09-02T19:57:08+5:30
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी १ सप्टेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले होते.

शिवसेनेचे खासदार जाधव,आमदार पाटील, वरपुडकरांसह ७ जणांवर गुन्हा दाखल
परभणी : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बुधवारी परभणीत आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार बंडू जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी १ सप्टेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच जिल्हाभरातून भागांतून युवक याआंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून खासदार बंडू जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रताप देशमुख, नसरसेवक अतुल सरोदे, रामप्रसाद रणेर, गुलमीर खान यांच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.