शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

सेलू बँक चोरी प्रकरण : चार दिवस उलटूनही चोरटे सापडेना; पोलीस पथकांचा तपास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 6:10 PM

चोरट्यांनी तिजोरी फोडून तब्बल 19 लाख रुपये रक्कम लंपास केले आहेत.

सेलू  (परभणी ) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेची तिजोरी फोडून तब्बल 19लाख 89 हजार रूपयाची रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलीसांना घटनेनंतर चार दिवस उलटूनही यश आले नाही. या प्रकरणी पोलिसांची चार पथके तपास करत आहेत. 

सेलू- पाथरी रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुख्य शाखा आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी बँकेच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून तिजोरी असलेल्या रूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिजोरी फोडून तब्बल 19 लाख रुपये रक्कम लंपास केली होती. घटनास्थळी चार चाकी वाहनांची स्टेपनी पोलीसांना आढळली होती.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मंठा या शहराजवळ टायर फुटलेली बेवारस कार पोलिसांना आढळून आली होती. ही कार चोरीची असल्याची माहिती असून सेलू पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात लावली आहे. 

चोरटय़ांच्या शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनने चार वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.माञ चौथ्या दिवशी ही पथकाला चोरट्यांचा शोध लागलेला नाही. चोरटय़ांनी चोरीत चारचाकी वाहनांचा वापर केला असल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित लावले नसल्याने त्यातून धागेदोरे मिळत नाहीत.केवळ एकाच चोरट्यांचा चेहरा थोडा स्पष्ट दिसत आहे. यामुळे तपासाला अधिक कालावधी लागत आहे. तसेच चोरट्यांचे चारचाकी वाहन मंठा शहराजवळ पंक्चर झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वाहनातून पोबारा केला असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :theftचोरीRobberyदरोडाbankबँकPoliceपोलिस