वाट्याची जमीन दे म्हणत सख्ख्या भावाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST2020-12-31T04:17:30+5:302020-12-31T04:17:30+5:30

बाभळगाव येथील फिर्यादी मधुकर बाबुराव रणेर व विठ्ठल रणेर या दोन भावांना दोन एकर शेती आहे. या शेतीवरून दोघा ...

Sakhya beating his brother saying give him a share of land | वाट्याची जमीन दे म्हणत सख्ख्या भावाला मारहाण

वाट्याची जमीन दे म्हणत सख्ख्या भावाला मारहाण

बाभळगाव येथील फिर्यादी मधुकर बाबुराव रणेर व विठ्ठल रणेर या दोन भावांना दोन एकर शेती आहे. या शेतीवरून दोघा भावांमध्ये नेहमी भांडणे होतात. २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता फिर्यादी मधुकर रणेर झोपडपट्टी परिसरातील किरायाच्या रूममध्ये मोबाईल पाहात बसले होते. तेव्हा आरोपी विठ्ठल रणेर व त्याचा सोबती अशोक रणेर यांनी दरवाजा तोडून आत येत तुझ्या वाट्याची जमीन मला का देत नाहीस, असे म्हणत मधुकर रणेर यांना थापड बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अशोक रणेर याने हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने डोक्यातून रक्तस्त्राव झाला, अशी फिर्याद मधुकर रणेर यांनी २९ डिसेंबर रोजी पाथरी पोलीस ठाण्यात दिली आहे .या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Sakhya beating his brother saying give him a share of land