पेडगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST2021-08-13T04:22:13+5:302021-08-13T04:22:13+5:30

संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सावता महाराज ग्रंथाचे वाचन करण्यात आले. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा बीडकर यांचे ...

Saint Sawta Maharaj Punyatithi ceremony at Pedgaon | पेडगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा

पेडगाव येथे संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा

संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सावता महाराज ग्रंथाचे वाचन करण्यात आले. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा बीडकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. याच कार्यक्रमात संत सावता माळी मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आमदार सुरेश वरपूडकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदार वरपूडकर यांच्या हस्ते स्थानिक विकास निधीतून बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुंजाभाऊ गायकवाड, टी. एम. देशमुख, लक्ष्मणराव गायकवाड, जितेंद्र देशमुख, नारायण देशमुख, बंडू देशमुख, कपील देशमुख, सुरेश पाथरकर, जालिंदर जीवने, माधव गायकवाड, नारायण गायकवाड, चेतन देशमुख, राम गायकवाड, महेश देशमुख, बाळासाहेब पुंड, अंकुश गायकवाड, नितीन गायकवाड व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Saint Sawta Maharaj Punyatithi ceremony at Pedgaon