शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

मृताच्या हातावर 'रूपाली' टॅटू, परभणीत अपहरण करून खूनामागे आर्थिक वाद की प्रेम प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:09 IST

अपहृत युवकाचा कॅनॉलजवळ आढळला मृतदेह; मयत परभणी तालुक्यातील संबर येथील रहिवासी

सेलू (जि. परभणी) : सेलू ते देवगावफाटा रस्त्यावर मोरेगाव कॅनॉलजवळ रविवारी सकाळी ७ च्या सुमारास युवकाचा मृतदेह आढळला. मयताचे शनिवारी रात्री १०:३० वाजता अपहरण झाले व त्यानंतर खून झाला, असा प्रकार पुढे आला आहे. मयत युवकाची ओळख पटली असून, ओंकार बन्सीधर गायकवाड (२८, रा. संबर, परभणी), असे त्याचे नाव आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सेलूचे सपोनि. संजय चव्हाण, उपनिरीक्षक बलभीम राऊत, विष्णुदास गरुड, अजय रासकटला, संजय गवते, नितीन राठोड, जगन्नाथ मुंढे, साधन कांगणे, पोलिस पाटील तुळशीराम मगर दाखल झाले होते. त्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे आले. मृताच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ इंग्रजी अक्षरात 'रूपाली' असे नाव गोंदलेले आढळले. या आधारे मृताची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असतानाच मयत युवकाचे नाव ओंकार बन्सीधर गायकवाड (संबर, परभणी), अशी ओळख पटली. या युवकाचे शनिवारी रात्री १०:३० वाजता चौघांनी कारमधून अपहरण केल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून भौतिक पुरावे गोळा केले. फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीस सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

अशी घडली घटनाशनिवारी रात्री १०:३० वाजता संबर येथून ओंकार गायकवाड याचे पप्पू वैद्य (रा. बोबडे टाकळी) व इतर अनोळखी तिघांनी कारमधून अपहरण केले. ओंकार, दिनकर गायकवाड आणि नातेवाईक अनिकेत साळवे हे चौफुलीवर बसले असताना पप्पू वैद्यने तू पैसे का देत नाहीस? असे म्हणत जबरदस्तीने ओंकारला कारमध्ये बसवले. ओंकार आणि पप्पू वैद्य यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय होता. पप्पूने यापूर्वी ओंकारकडून ५२ हजार रुपये घेतले होते आणि पुन्हा पैशाची मागणी करत होता, अशी फिर्याद ओंकारचे वडील बन्सीधर गायकवाड यांनी परभणी ग्रामीण ठाण्यात दिली. याप्रकरणी मध्यरात्री पप्पू वैद्य व अन्य तिघांवर भा.न्या.सं. कलम १४०(३), ३५१(२), ३ (५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाची दिशाट्रॅक्टरच्या पैशाच्या आर्थिक वादातून घटना घडल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले तरी अविवाहित मृत युवकाच्या उजव्या मनगटावर 'रूपाली' हे नाव इंग्रजीत गोंदवलेले आढळले. त्यामुळे प्रेमसंबंध संशयाच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. नदीम अन्सारी यांनी शवविच्छेदन केले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

आरोपींच्या शोधासाठी तीन पथकेसद्य:स्थितीत सेलू ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तरी, पुढील तपास परभणी ग्रामीण ठाण्यात सुरू आहे. दाखल गुन्ह्यात खुनाचा गुन्हा वाढवला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सेलू, परभणी व स्थानिक गुन्हे शाखेची अशी ३ पथके आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी