कृषी विद्यापीठात रॅगिंग, १० जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 03:45 IST2018-03-02T03:45:12+5:302018-03-02T03:45:12+5:30
महाविद्यालयात गाडी आणण्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्यास मारहाण करून रॅगींग केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात घडला.

कृषी विद्यापीठात रॅगिंग, १० जणांविरुद्ध गुन्हा
परभणी : महाविद्यालयात गाडी आणण्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्यास मारहाण करून रॅगींग केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात घडला. याप्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो कृषी शहरात राहत आहे तर विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी ‘तू बाहेर राहतोस, गाडी का आणतोस या कारणावरुन त्रास देत. तसेच सिनियर दिसले तर नमस्कार करावयास लावत. डिसेंबरमध्येही या विद्यार्थ्यांनी असा त्रास दिला होता.
गुरुवारी हा विद्यार्थी परीक्षा संपवून परत जात असताना विद्यापीठातील शिव मंदिराजवळ वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी त्याची गाडी अडविली. महाविद्यालयात गाडी का आणलीस, या कारणावरून त्याला मारहाण केली. या प्रकरणी जखमी विद्यार्थ्याने नवामोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रॅगींग करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे.