रोडे खून प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:01 IST2019-04-06T00:01:06+5:302019-04-06T00:01:38+5:30

येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणी दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Rode murder case accused in custody | रोडे खून प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

रोडे खून प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणी दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
३१ मार्च रोजी सकाळी अमरदीप रोडे यांचा खून झाला होता. या घटनेनंतर किरण डाके आणि रवि गायकवाड हे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी १ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी न्यायालयाने या दोघांनाही ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात अटकेत असलेल्या महिला आरोपी मीनाक्षी गायकवाड हिस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी तीन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Rode murder case accused in custody