पाथरीमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरी; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 18:52 IST2018-10-03T18:51:01+5:302018-10-03T18:52:08+5:30

शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीतील तीन घरात  धाडसी चोरीची घटना आज पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली.

robbery in three houses in one night at pathari | पाथरीमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरी; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास 

पाथरीमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरी; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास 

पाथरी (परभणी ) : शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीतील तीन घरात  धाडसी चोरीची घटना आज पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली. यात चोरट्यांनी जवळपास ४ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

माळीवाडा येथील पंकज मोहन नाईक यांच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी नगदी ८०  हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे दागिने, चंद्रसिंह एकनाथ नाईक यांच्या घरातून ७०  हजार रुपये नगदी आणि १ लाख रुपये किमतीचे दागिने तर मंगेश लक्ष्मण नाईक यांच्या घरातील ६ हजार रोख असा एकूण ४ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.  

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.उपविभागीय पोलीस अधीक्षक रेणुका वाकळे, पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमन्वर यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेने ठसे तज्ञ व श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरु केला आहे.  

Web Title: robbery in three houses in one night at pathari