पाथरीतील चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांना मारहाण करत लाखोचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 17:32 IST2019-04-01T17:30:44+5:302019-04-01T17:32:10+5:30

दरोडेखोरांच्या मारहाणीत घरातील महिला जखमी झाल्या आहेत. 

robbery in pathari;millions looted | पाथरीतील चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांना मारहाण करत लाखोचा ऐवज लुटला

पाथरीतील चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांना मारहाण करत लाखोचा ऐवज लुटला

पाथरी (परभणी ) :  शहरातील सागर कॉलनीत एका घराचे गेट तोडून चोरट्यांनी 1 लाखाचा ऐवज लुटल्याची घटना पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत घरातील महिला जखमी झाल्या आहेत. 

सागर कॉलोनी परिसरात दत्तात्रय चंद्रकांत मळी यांचे घर आहे. रविवारी त्यांच्याकडे काही नातेवाईक आले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास मळी यांच्या घराच्या मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. महिला झोपलेल्या खोलीत त्यांनी प्रवेश करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. बाजूच्या खोलीत झोपलेले मळी त्यांच्या आवाजाने जागे. त्यांनी त्वरित शेजाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली.  

दरम्यान, चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील ३ तोळे सोने आणि ४८ हजार रोख असा ऐवज ताब्यात घेतला. शेजारी घराकडे येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढाला. पलायन करताना जमलेल्या नागरिकांवर त्यांनी दगडफेक केली. यात काही नागरिक जखमी झाले. याप्रकरणी दत्ता मळी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सुरु आहे. 

Web Title: robbery in pathari;millions looted