खिडक्यांचे ग्रील तोडून चोरटे शिरले घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:26 IST2019-07-25T18:21:26+5:302019-07-25T18:26:19+5:30

खोलीतील हँगरला लटकविलेल्या पॅन्टच्या खिशातील रक्कम लंपास

robbers Break the grill of the windows and enter the house | खिडक्यांचे ग्रील तोडून चोरटे शिरले घरात

खिडक्यांचे ग्रील तोडून चोरटे शिरले घरात

परभणी : शहरातील सुयोग कॉलनी भागात एका घराच्या खिडक्यांचे ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवत रोख चार हजार रुपये लांबविल्याची घटना २४ जुलै रोजी मध्यरात्री घडली आहे.

शहरातील सुयोग कॉलनी वसाहतीत वैजनाथ शंकरराव सातपुते यांचे निवासस्थान आहे. २४ जुलै रोजी सातपुते व त्यांची पत्नी असे दोघेजण घरी होते. वातावरणात उकाडा वाढल्याने त्यांनी घरातील एका खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. याची संधी साधत चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश मिळविला. कपाट उघडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले; परंतु त्यात त्यांना काहीही मिळाले नाही. याच खोलीतील हँगरला लटकविलेल्या पॅन्टच्या खिशातील चार हजार रुपये चोरट्यांनी घेऊन पोबारा केला आहे. सकाळी उठल्यानंतर वैजनाथ सातपुते यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र श्वान मुख्य रस्त्यापर्यंतच मार्ग काढू शकला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

Web Title: robbers Break the grill of the windows and enter the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.