रस्त्याचा वाद महसूल प्रशासनाने मिटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST2021-04-20T04:17:44+5:302021-04-20T04:17:44+5:30
कौसडी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी केली आहे. ...

रस्त्याचा वाद महसूल प्रशासनाने मिटविला
कौसडी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी केली आहे. मात्र, या इमारतीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने, ही इमारत मागील काही दिवसांपासून धूळखात पडून होती. या ठिकाणी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने १६ एप्रिल रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर, या केंद्राकडे येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता खुला करून देण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले. त्यानंतर, तहसील प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात १७ एप्रिल रोजी या ठिकाणचा रस्ता खुला करून दिला. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार परेश चौधरी, एच.आर. सोनवणे, प्रशांत राखे, सुरेश रोडगे, विजय बोधले, तलाठी निकेश पराचे, धनंजय सोनवणे, तातेराव बारावकर, शेख अल्ताफ शेख मेहबूब आदींची उपस्थिती होती.