शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:54 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

ठळक मुद्देसाडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी एकाच केंद्रावरअत्याधुनिक साहित्याचा अभाव

परभणी :  शहरातील महानगरपालिकेच्या जुन्या सेंट्रल नाका भागातील अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये सर्व १३ कर्मचारी कंत्राटी असल्याने या कर्मचाऱ्यावरच अग्निशमन दलाचा डोलारा अवलंबून आहे.

परभणी शहराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांच्या घरात आहे. या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने परभणी शहरातील सेंट्रल नाका भागात अग्निशमन दलाचे केंद्र कार्यरत आहे. यामधून शहर व परिसरातील आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचे काम केले जाते. 

या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी व आधुनिक साहित्याचा भरणा असणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. या केंद्रात ४ फायरमन, ४ मदतनिस, ५ वाहन चालक कार्यरत असून, हे सर्व कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करतात. त्याचबरोबर या केंद्रात ३ वाहने असून, त्यातील केवळ एकच वाहन हे अत्याधुनिक स्वरुपाचे आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

९६ आगीच्या घटनापरभणी व शहर परिसरात १ मार्च ते ३० ऑक्टोबर या काळात आगीच्या ९६ घटना घडल्या आहेत. यामध्ये ८३ फायरमन तर १३ घटनांमध्ये रेस्क्यू करून अनेक नागरिकांना संकटातून बाहेर काढण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षितेच्या जबाबदारीचा भार एका अग्नीशमन केंद्रावर येत आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने अग्नीशमन दलाची केंद्रे वाढिवण्याची मागणी होत आहे. 

अत्याधुनिक साहित्याचा अभावशहरातील कानाकोपऱ्यात घडलेल्या आगीच्या घटना विझवण्याचे काम परभणी येथील अग्नीशमन केंद्र करीत असले तरी या ठिकाणी या केंद्रांकडे केवळ तीनच वाहने उपलब्ध आहेत. त्यातील दोन वाहने जुनी असून, एकच वाहन आधुनिक यंत्रांनी युक्त आहे. त्यामुळे शहरात घडणाऱ्या घटना आटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागते.

प्रशिक्षीत कर्मचारी मिळेनातपरभणी येथील अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपाचे आहेत. यामध्ये फायरमन, मदतनिस व वाहन चालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी मनपाच्या वसाहतीमध्ये वास्तव्याला राहत नाहीत. त्यातही एक कर्मचारी मनपातील पाणीपुरवठा विभागातील चालक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशिक्षीत कायमस्वरुपी कर्मचारी असणे गरजेचे आहे. 

मनपाच्या अग्नीशमन दलामध्ये १३ कर्मचारी असून, हे कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहेत. अत्याधुनिक साधनांसह ३ वाहने आहेत. त्याचबरोबर हायड्रोलिक, केमीकल, गॅसच्या घटनाही आटोक्यात आणण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे. शहरातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना वेळेत आटोक्यात आणण्यास मदत होते.                 -दीपक कानोडे, विभागप्रमुख 

टॅग्स :parabhaniपरभणीFire Brigadeअग्निशमन दलParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका