राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST2021-06-22T04:13:20+5:302021-06-22T04:13:20+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे २९ जून रोजी परभणी दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. ...

Response to NCP meeting | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे २९ जून रोजी परभणी दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढविणे, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विविध प्रश्न समजून घेणे यासह पक्षाकडून जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्याच्या योजनांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली, तसेच कोरोनाकाळात पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. बैठकीस माजी महापौर प्रताप देशमुख, मनपाचे गटनेते जाकेर लाला, रामेश्वर आवरगंड, शंकर भागवत, बाबामियाँ पिंजारी, विकास लंगोटे, अली खान, पाशा कुरेशी, ॲड. अमोल पाथरीकर, डॉ. संजय खिल्लारे, रामचंद्र रोडे, बालासाहेब दुधगावकर, बालासाहेब बुलबुले आदींची उपस्थिती होती. यावेळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करावयाचे कार्यक्रम, तसेच जिल्ह्यातील रखडलेल्या विकास प्रश्नांवर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

Web Title: Response to NCP meeting