शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

योजनेत नाव समाविष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

सरपंचपदी रोहिदास सूर्यवंशी यांची निवड आलेगाव : पूर्णा तालुक्यातील कलमुला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोहिदास सूर्यवंशी यांची तर उपसरपंचपदी सारजाबाई बोकारे ...

सरपंचपदी रोहिदास सूर्यवंशी यांची निवड

आलेगाव : पूर्णा तालुक्यातील कलमुला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोहिदास सूर्यवंशी यांची तर उपसरपंचपदी सारजाबाई बोकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीत बैठक घेण्यात आली. यावेळी निर्वाचन अधिकारी एस. एस. डोंगरदिवे, ग्रामसेविका ज्योती वडजे, सदस्य जयश्री सूर्यवंशी, ललिता उटकर, कविता उटकर उपस्थित होते.

असोला येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन

असोला : परभणी तालुक्यातील असोला येथे गुरुवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सरपंच वत्सलाबाई जावळे, उपसरपंच त्र्यंबक भरोसे, पंचायत समिती सदस्य मीनाक्षीताई भरोसे, ग्रामपंचायत सदस्य व्यंकटी जावळे, ए.एस. वैरागर आदींची उपस्थिती होती .

आलेगाव येथे युवा सेनेची शाखा स्थापना

आलेगाव : पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे नुकतीच युवा सेनेची शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेचे जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रदीप सोळंके, प्रतीक जोशी, सुधाकर खराटे, माणिक सूर्यवंशी, बंडूआप्पा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

रस्त्याचे काम सुरू

मानाली : मानवत तालुक्यातील मानोली ते मानवत रोड या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे. कामाचा चांगला दर्जा ठेवण्याची मागणी होत आहे.

मुंबईतील आंदोलनात शिक्षक सहभागी

जिंतूर : मुंबई येथे खाजगी विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना कायम करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जिंतूर तालुक्यातील शिक्षक सहभागी झाले आहेत. याबाबतची माहिती सय्यद हकीम, गुलाब जाधव या शिक्षकांनी दिली.

१० पर्यंत पटसंख्या असलेल्या ३७ शाळा

परभणी : जिल्ह्यात १० विद्यार्थ्यांपर्यंत पटसंख्या असलेल्या एकूण ३७ शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ शाळांचा समावेश आहे. तसेच २३ शाळा या खाजगी विना अनुदानित तत्वावरील आहेत. एक शाळा खाजगी अनुदानित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.