शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

परभणी जिल्ह्यातील पाच हुतात्मा स्मारकांची होणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 7:04 PM

पाच हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती, नुतणीकरणासाठी राज्य शासनाने ३५ लाख ७८ हजार ७१० रुपयांच्या अनुदान वितरणास मंजुरी दिली आहे. 

ठळक मुद्देभारतीय स्वातंत्र्य लढा, हैदराबाद मुक्तीसंग्राम, गोवा मुक्ती आंदोलनामध्ये भाग घेऊन ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले, अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ शासनाच्या वतीने हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. या हुतात्मा स्मारकांचे बांधकाम होऊन जवळपास ३५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे अनेक हुतात्मा स्मारकांची दुरावस्था झाली आहे.

परभणी : जिल्ह्यातील पाच हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती, नुतणीकरणासाठी राज्य शासनाने ३५ लाख ७८ हजार ७१० रुपयांच्या अनुदान वितरणास मंजुरी दिली आहे. 

भारतीय स्वातंत्र्य लढा, हैदराबाद मुक्तीसंग्राम, गोवा मुक्ती आंदोलनामध्ये भाग घेऊन ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले, अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ शासनाच्या वतीने हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. या हुतात्मा स्मारकांचे बांधकाम होऊन जवळपास ३५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे अनेक हुतात्मा स्मारकांची दुरावस्था झाली आहे. भिंतीला तडे जाणे, पत्रे निखळणे, फरशी उखडणे परिसरात अस्वच्छता निर्माण होणे यामुळे दुरावस्थेत भर पडली आहे. या हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे २०१५-१६ मध्ये राज्यभरातील २०६ हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचे नियतव्यय उपलब्ध करुन देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. यासाठीचा २५ कोटी रुपयांचा निधी २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झाला आहे. यातील परभणी जिल्ह्यातील पाच हुतात्मा स्मारकांसाठी ३५ लाख ७८ हजार ७१० रुपयांच्या अनुदान वितरणास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, चारठाणा, पाथरी आदी हुतात्मा स्मारकांच्या नुतनीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. 

निधीतून होणार ही कामेजिल्ह्यासाठी मंजूर निधीमधून सर्व हुतात्मा स्मारकांच्या फरसबंदीकरीता पॉलिश कोटा वापरण्यात येणार असून आतमध्ये ग्रेनाईटची पट्टी बसविली जाणार आहे. तसेच प्रोजेक्टरसाठी व वातानुकूलीत यंत्रासाठी विद्युत व्यवस्था करावी लागणार आहे. शिवाय हुतात्मा स्मारकामध्ये अद्ययावत ग्रंथालय तयार करण्यात येणार आहे. शिवाय स्वयंपाक घर, बाथरुम अद्ययावत करुन स्लाईडींग विंडो लावण्यात येणार आहेत. स्मारकातील काही  हॉल खाली-वर असल्याने ते एकत्र केले जाणार आहेत. शिवाय स्मारकावर पावडर कोटेड पत्रे बसविण्यात येणार आहेत. ज्या हुतात्मा स्मारकामध्ये सेफ्टीक टँक नाही, अशा हुतात्मा स्मारकात हा टँक बसविण्यात येणार आहे. तसेच सोलार पंप बसविले जाणार असून नवीन टाक्या बसविण्यात येणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणी