बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:22+5:302021-04-18T04:16:22+5:30
परभणी : येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातून बांधकाम व इतर कामगारांची नोंदणी बोगस झाली असून, या प्रकरणी चौकशी करावी, ...

बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी
परभणी : येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातून बांधकाम व इतर कामगारांची नोंदणी बोगस झाली असून, या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने केली आहे.
बांधकाम कामगारांसाठी सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेत अनियमितता केली आहे. नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी केली. विशेष म्हणजे, यासंदर्भात माहिती मागितल्यानंतर तीही दिली जात नाही. अभिलेखांचे जतन केले जात नाही. सामाजिक संस्था आणि संघटनांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. या कार्यालयात शासकीय निधीचा गैरवापर होत आहे, तेंव्हा या प्रकरणाची चौकशी करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र सचिव महबूब खान पठाण, जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर, शेख उस्मान शेख इस्माईल, शेख गणी शेख रहेमान आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.