शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्या! परभणी मनपात एका मताने पराभव झालेल्या उमेदवाराची कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:18 IST

एका मताने झालेला विजय आणि एका मताने झालेला पराभव या दोन्ही बाबींमुळे राज्यभर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.

- राजन मंगरुळकरपरभणी : महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग एक अ मधील दोन उमेदवारातील लढत ही अटीतटीची ठरली होती. केवळ एका मताने विजयी झालेल्या उद्धव सेनेच्या नगरसेवकाच्या विजयाविरोधात पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवाराने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पुन्हा निवडणूक प्रक्रिया घेण्याची मागणी केल्याचे प्रसाद नागरे यांनी स्पष्ट केले. 

शहरातील प्रभाग क्रमांक एक अ मधील निवडणूक रिंगणात उद्धव सेनेकडून व्यंकट डहाळे आणि भाजपकडून प्रसाद उर्फ बबलू नागरे हे होते. यामध्ये उद्धव सेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे हे एका मताने विजयी झाले होते. या निकालावरून काही वेळ गोंधळ सुरू होता. सर्व बाजू तपासल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यंकट डहाळे यांचा एका मताने विजय झाल्याचे जाहीर केले होते.

पराभूत उमेदवार प्रसाद नागरे यांनी या निर्णयाविरोधात अखेर कोर्टात धाव घेतली आहे. सोबतच त्यांनी पोस्टल मतदान प्रक्रियेतील गंभीर बाबी निवडणूक आयोगासह न्यायालयास तक्रार आणि याचिकेद्वारे निदर्शनास आणून दिल्या. तर त्यांच्यासोबत प्रभाग एक ड मधील भाजपचे पराभूत उमेदवार दत्तराव रेंगे यांनी सुद्धा काही मतदान बूथ आणि निवडणूक निकालपत्रातील मतांच्या बाबी संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. एका मताने झालेला विजय आणि एका मताने झालेला पराभव या दोन्ही बाबींमुळे राज्यभर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Election Dispute: One-Vote Loss Sparks Court Challenge, Recount Demand

Web Summary : In Parbhani, a BJP candidate challenged Uddhav Sena's victory by one vote in court, alleging postal vote irregularities. Another BJP candidate also seeks a recount due to discrepancies. The narrow margin has made the election a statewide talking point.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Courtन्यायालयparabhaniपरभणीElectionनिवडणूक 2026