लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गंगाखेड येथे गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 08:05 PM2018-09-17T20:05:58+5:302018-09-17T20:07:24+5:30

लग्नाचे आमिष दाखवुन तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वैतागवाडी येथे घडली

rape on Minor girl by promising marriage; Filed a complaint at Gangakhed | लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गंगाखेड येथे गुन्हा दाखल 

लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गंगाखेड येथे गुन्हा दाखल 

Next

गंगाखेड (परभणी ) : लग्नाचे आमिष दाखवुन तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वैतागवाडी (ता. सोनपेठ) शेत शिवारात दि. ९ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आज पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष रामचंद्र चव्हाण (रा. उंदरवाडी ता. सोनपेठ) असे आरोपीचे नाव आहे. चव्हाण याने ९ सप्टेंबरला रात्री १० वाजेच्या सुमारास वैतागवाडी शिवारात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. घडलेला प्रकार पिडित मुलीच्या घरी समजला असता तिच्या आईने रविवारी (दि. १६ ) रात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून चव्हाण विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार अधिनियमाच्या कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे, पोलीस शिपाई गणेश वाघ हे करत आहेत.

Web Title: rape on Minor girl by promising marriage; Filed a complaint at Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.