जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:13+5:302021-06-01T04:14:13+5:30
दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात पाऊस होत आहे. ३१ मे रोजी सकाळपासूनच जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. त्यामुळे पाऊस होईल, ...

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात पाऊस होत आहे. ३१ मे रोजी सकाळपासूनच जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. त्यामुळे पाऊस होईल, असा अंदाज होता. परभणी तालुक्यातील भोगाव, पान्हेरा, पेडगाव, आळंद भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पालम शहर आणि परिसरात अर्धा तास, सोनपेठ शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह एक तास, गंगाखेड तालुक्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अर्धा तास मध्यम पाऊस बरसला. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पेरणी पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतशिवारात सकाळपासूनच शेतकरी दाखल होत आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी, मजुरांची धांदल उडाली.
वीज पडून युवकाचा मृत्यू
मानवत तालुक्यातील पाळोदी शिवारात शेतात मशागतीचे काम करणाऱ्या एका युवकाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर टरपले असे मयत युवकाचे नाव आहे.