रबी हंगामातील पिके बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:34+5:302021-02-09T04:19:34+5:30
जिंतूर-परभणी महामार्ग कामाला गती परभणी : जिंतूर-परभणी या महामार्गावर मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र मागील दीड वर्षांपासून ...

रबी हंगामातील पिके बहरली
जिंतूर-परभणी महामार्ग कामाला गती
परभणी : जिंतूर-परभणी या महामार्गावर मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र मागील दीड वर्षांपासून कामाला गती मिळत नसल्याने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत होती. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने परभणी ते टाकळी कुंभकर्ण दरम्यानच्या रस्त्याचे काम गतीने सुरू आहे.
निधी मंजूर होवूनही होईना रस्तयाचे काम
परभणी : तालुक्यातील आर्वी ते कुंभारी बाजार या ५ किमी रस्त्यासाठी जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाकडून जवळपास १५ लाख रुपयांचा निधी मंजुर झालेला आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून निधी मंजूर होवूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
ब्राम्हणगाव ते मांडाखळी रस्त्याची दुरवस्था
परभणी : तालुक्यातील ब्राम्हणगाव ते मांडाखळी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र रस्ता दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलले जात नाहीत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध वार्डमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हा सामान्य प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
पूर्णा शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
पूर्णा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मानवत शहरात वाहतुकीची कोंडी
मानवत : शहरातील बहुतांश रस्ते हे अरुंद झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातील वाहनधारक आपली वाहने या रस्त्यावरच उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना त्रास होत आहे.
कृषी विभागात शेतकऱ्यांचे हेलपाटे
पालम : येथील तालुका कृषी कार्यालयात आनलाईन अर्ज मारूनही शासनाच्या विविध योजनाची सोडत काढण्यात आली. नवी त्यामुळे शेतकरी कृषी कार्यालयात हेलपाटे मारून बेजार होत आहेत. कृषी विभागाने या वर्षी हार्टीनेट यंत्रणा वापरून विविध योजना साठी अर्ज मागवले आहेत. कोरोनाकाळात व नंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केलेली आहे. पण अजूनही सोडत कडे दुर्लक्ष केले जाते आहे.