७० हजार क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:12+5:302021-02-05T06:05:12+5:30
सोनपेठ तालुक्यात दरवर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यावर्षीही तालुक्यात १७ हजार ४८ हेक्टरवर कापसाचा पेरा करण्यात आला ...

७० हजार क्विंटल कापसाची खरेदी
सोनपेठ तालुक्यात दरवर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यावर्षीही तालुक्यात १७ हजार ४८ हेक्टरवर कापसाचा पेरा करण्यात आला आहे. शासनाने कापसाचा ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआय, फेडरेशनकडून तालुक्यात कापसाच्या खरेदीसाठी ३ जिनिंगमध्ये खरेदी करण्यात येत आहे. तालुक्यात ९ हजार ३०० शेतकऱ्यांनी कापसाची ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आला आहे. परंतु आतापर्यंत केवळ पणन महासंघाकडे ६२० शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल व सीसीआयचा खरेदी केंद्रावर १ हजार ६६८ शेतकऱ्यांनी ५० हजार २६८ क्विंटल असा एकूण २ हजार २२८ शेतकऱ्यांनी ७० हजार २६८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अद्यापही ऑनलाइन नोंदणी केलेल्या ७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणलेला नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याने ५ फेब्रुवारीपर्यंत करम येथील सालासर जिनिंग येथे कापूस विक्रीस आणण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. त्या शेतकऱ्यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत करम येथील सालासर जिनिंग येथे कापूस विक्रीस आणावा. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरले जाणार नाही.
राजेश विटेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती.