संविधानाची प्रत जाळल्याचा परभणीत संघटनांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:24 IST2018-08-14T00:23:39+5:302018-08-14T00:24:25+5:30
दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार ९ आॅगस्ट रोजी घडला़ या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, विविध सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करीत आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. समता अभियान

संविधानाची प्रत जाळल्याचा परभणीत संघटनांकडून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार ९ आॅगस्ट रोजी घडला़ या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, विविध सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करीत आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
समता अभियान
दिल्ली येथील घटनेचा विविध संघटनांनी निषेध केला आहे़ समता अभियानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ संविधान जाळणाºया आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली़ निवेदनावर राहुल मोगले, प्रा़ राज मन्वर, वैजनाथ टोमके, दीपक मस्के, राज मस्के, जतीन पानपट्टे, दिलीप कांबळे, रोहन पुंडगे, मोहनसिंग टाक, कार्तिक फोटफोडे, नामदेव लहाडे आदींची नावे आहेत़
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)
परभणी-नवी दिल्ली येथे संविधानाच्या प्रतीचे दहन केल्याचा निषेध नोंदविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले़ रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करीत नवी दिल्ली येथील घटनेचा निषेध नोंदविला़ युथ फॉर इक्वॉलिटी व आझाद सेना या संघटनेच्या वतीने ९ आॅगस्ट रोजी संविधानाच्या प्रतीचे दहन करून भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या़ या प्रकारामुळे संविधानप्रेमी व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत़ संविधान हे देशाचे व देशवासियांची आस्मिता आहे़ त्यामुळे संविधानाच्या प्रती जाळणाºया समाजकंटकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपाइंचे राज्य संघटक डी़एऩ दाभाडे यांनी केली़ यावेळी अॅड़ लक्ष्मण बनसोडे, रानूबाई वायवळ, मनोहर सावंत, सखाराम मस्के, आप्पा गाढे, बाळासाहेब गायकवाड, बापूराव वाघमारे, भगवान कांबळे, भाऊराव सावणे, विजय टेकुळे, शेख मुसा, शेख चाँद, शेख सरफराज, वाजेद पठाण, राहुल शिवभगत, गंगूबाई केकाने, संगीता भराडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़