शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

परभणीतील कचऱ्यावर बोरवंडमध्ये प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:35 AM

शहर परिसरातील धाररोडवरील कचरा डेपो आता बोरवंड शिवारातील महापालिकेच्या जागेत हलविला जाणार असून, सुमारे बारा कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने परभणीतील कचºयाचा प्रश्न लवकरच कायमस्वरुपी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर परिसरातील धाररोडवरील कचरा डेपो आता बोरवंड शिवारातील महापालिकेच्या जागेत हलविला जाणार असून, सुमारे बारा कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने परभणीतील कचºयाचा प्रश्न लवकरच कायमस्वरुपी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.परभणी शहरात दररोज सुमारे ७० मेट्रीक टन कचरा जमा होतो. हा कचरा शहराजवळच असलेल्या धाररोडवरील डम्पिंग ग्राऊंडवर जमा केला जातो. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कचºयाचे विघटन केले जात असल्याने या कचºयाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. नागरी वसाहती वाढत चालल्याने येथील कचरा डेपो इतर ठिकाणी हलवावा, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. दिवसेंदिवस शहरातील कचºयातही वाढ होत असल्याने कचºयाचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करणे आवश्यक झाले होते. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने कचºयाचे विघटन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. शहरापासून साधारणत: ८ ते १० कि.मी. अंतरावर बोरवंड शिवारात मनपाच्या मालकीची जागा असून, या जागेत कचरा डेपो उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.या प्रकल्पांतर्गत महापालिकेने दोन टप्प्यात निविदा मागविल्या आहेत. बोरवंड शिवारात कचरा डेपो उभारण्यासाठी बांधकामे करणे, कचºयाचे योग्य प्रकारे विघटन करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व बांधकाम केले जाणार असून, संपूर्ण मैदानाला संरक्षक भिंत बांधणे, त्या ठिकाणी मोठ्या झाडांचे रोपण करणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रोसेसिंग युनिट उभारणे अशा दोन प्रकारात निविदा मागविण्यात आल्या.यासाठी प्राप्त झालेल्या निविदांमधून मनपाने एक निविदा अंतिम केली असून, महापालिकेच्या सभागृहाची परवानगी घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. येत्या एक ते दोन आठवड्यात बोरवंड येथे प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे परभणी शहरातील कचºयावर आता बोरवंड शिवारात प्रक्रिया होणार असून, धाररोडवरील कचरा डेपोचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.खतावरील प्रक्रियेसाठी पाच वर्षांचे कंत्राटबोरवंड येथे पर्यावरण पूरक पद्धतीने कचºयाचे विघटन करण्यासाठी पाच वर्षांसाठी एका एजन्सीला कंत्राट दिले जाणार आहे. ही एजन्सी प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करणार आहे. त्यात कचºयापासून खत निर्मिती, बायोगॅस निर्मिती, प्लास्टीकपासून आॅईल तयार करणे, विटा बनविणे असे प्रकल्प येथे उभारण्याचा मानस आयुक्त रमेश पवार यांनी बोलून दाखविला. प्रोसेसिंग युनिट उभारण्यासंदर्भातील प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून, महिना अखेर या कामालाही सुरुवात होईल, असे पवार यांनी सांगितले.विलगीकरण करुनच जमा करणार कचराशहरातील कचरा जमा करण्याच्या पद्धतीतही मनपाने बदल केला आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा केला जाणार आहे. त्यासाठी शालीमार कन्स्ट्रक्शन या एजन्सीला कंत्राट देण्यात आले असून, मनपाच्या ७० घंटागाड्या आणि एजन्सीच्या मालकीच्या आणखी २५ घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. या घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असून, प्रत्येक प्रभागात ही घंटागाडी फिरविली जाणार आहे. विलगीकरण करुन जमा केलेला कचरा बोरवंड येथील कचरा डेपोत नेऊन टाकला जाणार आहे.नैसर्गिक वातावरण निर्मितीवर भर४बोरवंड येथील कचरा डेपोत नैसर्गिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यातून या ठिकाणी दाट झाडी लावली जाणार असून, कचºयावर प्रक्रिया करताना दुर्गंधी वातावरणात पसरु नये, याचीही काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे या कचरा डेपोतून पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबरच मनपाला आर्थिक उत्पन्न वाढविण्यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती मनपातून देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न