शेळ्या, कोंबड्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:01+5:302021-02-05T06:05:01+5:30
पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी परभणी : शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना वाहने उभी करण्यासाठी तारेवरची ...

शेळ्या, कोंबड्याचे भाव घसरले
पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी
परभणी : शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना वाहने उभी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महानगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपूर्वी पार्किंग झोन करण्यात आले होते; परंतु, या अनुषंगाने मनपाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आली नाही. शिवाय वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे वाहनधारक कोठेही वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे मनपा व शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पुलाच्या कामांमुळे वाहनधारक त्रस्त
गंगाखेड: गंगाखेड- परभणी रस्त्यावरील विविध ठिकाणच्या पुलांची कामे रखडली आहेत. या मार्गावरील रस्ता काही प्रमाणात तयार झाला आहेत; परंतु, कंत्राटदाराने पूल उभारणीच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.परिणामी वाहनधारकांना येथील रस्त्यावरुन वाहतूक करताना अडचण होत आहे.
रस्ते खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी
परभणी : शहरात नव्याने तयार केलेले रस्ते नळाची पाईपलाईन टाकण्याच्या उद्देशाने खोदण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. अगोदर पाईपलाईन टाकून नंतर रस्त्यांची दुरुस्ती का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.