बारा जुगाºयांवर परभणीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:57 IST2018-01-28T23:57:35+5:302018-01-28T23:57:39+5:30

शहरातील वांगीरोेड भागात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी १२ जुगाºयांना अटक करण्यात आली आहे.

Prejudiced Action on Twelve Jugs | बारा जुगाºयांवर परभणीत कारवाई

बारा जुगाºयांवर परभणीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वांगीरोेड भागात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी १२ जुगाºयांना अटक करण्यात आली आहे.
वांगीरोड भागात जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने रविवारी सायंकाळी या भागात जाऊन छापा टाकला; त्यावेळी गोलाकार पद्धतीने बसून जुगार खेळला जात होता. अचानक पोलीस दाखल झाल्याचे लक्षात येताच काही जुगाºयांनी या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी १२ जुगाºयांना पकडले असून त्यांच्याकडून १२ मोबाईल, ९ मोटारसायकल आणि नगदी ३३ हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, चंद्रकांत टाकरस, सखाराम टेकुळे, गोविंद एकीलवाले, यशवंत वाघमारे यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक विवेक सोनवणे तपास करीत आहेत.
दोन तास कारवाई
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकल्यानंतर ही कारवाई पूर्ण करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Prejudiced Action on Twelve Jugs