मान्सूनपूर्व पावसाने चार गावांना झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:19+5:302021-06-09T04:22:19+5:30
मागील महिनाभरापासून खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. त्यातच सोमवारी परभणी तालुक्यातील कुंभारी ...

मान्सूनपूर्व पावसाने चार गावांना झोडपले
मागील महिनाभरापासून खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. त्यातच सोमवारी परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार, कारला, आर्वी व डिग्रस या चार गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. मेघगर्जनेसह तीन तास झालेल्या पावसामुळे गाव व परिसरातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले. तसेच मशागतीची कामे करत असलेल्या शेतकऱ्यांची ही अचानक पाऊस सुरू झाल्याने चांगलीच धावपळ उडाल्याचे सोमवारी दिसून आले. तसेच अनेक शेतामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे पावसाचा जोर चांगला असल्याने कुंभारी व परिसरात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले. निम्न दुधना प्रकल्पाच्या कुंभारी परिसरातील उजव्या कालव्यातून सहा तास पाणी वाहू लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.