शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'मनपा'साठी आश्वासनांची खैरात; विश्वास ठेवायचा तरी कोणत्या पक्षावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:16 IST

नेत्यांच्या रोज होताहेत सभा; सगळ्या पक्षांकडून वाचला जातोय त्याच समस्यांचा पाढा

परभणी: महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी नेत्यांच्या रोज सभा होत आहेत. कोणी प्रभाग दत्तक घेत आहे तर कोणी शहरच. कोणी विकासाची जबाबदारी घेत आहे तर कोणी कोट्यवधींच्या निधीतून विकासाची स्वप्ने दाखवत आहे. मात्र, मूलभूत समस्या पूर्ण होण्यासाठी झुरणाऱ्या या शहराला कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न पडला आहे. शिवाय काही ठिकाणी तर या घोषणांवर स्थानिक अथवा प्रभागातील नेतृत्वच भारी पडताना दिसत आहे.

मनपा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील समस्यांचा ऊहापोह होत आहे. त्यावर उपायही नेतेमंडळी, नगरसेवकपदाचे उमेदवार शोधत आहेत. मात्र, यातील अनेक समस्या वर्षानुवर्षे कायम असून प्रत्येक निवडणुकीत तीच आश्वासने देऊन उमेदवारही थकत नाहीत. यावेळी पुन्हा त्याच आश्वासनांच्या घोषणा ऐकून मतदारांचेही कान पिकले आहेत.

यावेळी तर नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या सुरात सूर मिसळत नेतेही तोच राग आळवत आहेत. ज्या शहरात आतापर्यंत मूलभूत सुविधाच निर्माण होऊ शकल्या नाहीत, तेथे कोट्यवधींच्या निधीची उड्डाणे घेणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न मतदारांना पडला.

म्हणे, सत्ता दिली तरच विकास सत्ता दिली तरच विकास हे एक नवे सूत्र पुढाऱ्यांच्या भाषणांतून समोर येत आहे. ही एकप्रकारे मतदारांना धमकीच असली तरीही मतदार मात्र तिला भीक घालतील, असे चित्र नाही. त्यातही परभणीच्या सोशिक जनतेवर याचा तीळमात्र फरक पडेल, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे झेपेल तीच आश्वासने देऊन मतदारांना उगीच दिवास्वप्ने दाखवणे बंद होण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या पक्षाला विकासाची एवढीच चिंता आहे तर सत्ता मिळाली किंवा नाही मिळाली तरीही ही कामे करता येणार नाहीत का? मग या वल्गना कशासाठी? असा प्रश्नही मतदारांना पडला आहे.

आणखी किती आश्वासने देणार?स्वच्छता, उद्यान विकास, पाणीपुरवठा या मूलभूत समस्यांचीच आश्वासने अनेक भागांत द्यावी लागत आहेत. भुयारी गटार योजना पूर्ण झाल्याशिवाय यातील इतर अनेक आश्वासने पूर्ण करता येणेही शक्य नाही. भुयारी गटार व समांतर पाणीपुरवठा योजनाच सुधारित दराने मंजूर न झाल्यास तिला विरोध होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या सभागृहात हा मुद्दा हॉट राहणार आहे.

लक्ष्मीअस्त्राचे सुरू झाले नियोजनपुढचे दोन दिवस आता रात्र वैन्ऱ्याची समजून उमेदवार व समर्थकांना जागून काढावे लागणार आहेत. ज्यांचे पारडे जड दिसत नाही, त्यांनी आता लक्ष्मीअस्त्राची तयारी सुरू केली आहे. कोणत्या भागावर फोकस करायचा, याचाही इरादा पक्का झाल्याचे दिसत आहे. वात वर्षानुवर्षे अनुभय असलेले मात्र निश्चिंत असून नय्यांनाच या नियोजनाची घाई दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Municipal Elections: Empty Promises Galore, Which Party to Trust?

Web Summary : Parbhani voters are skeptical as leaders offer familiar promises of development during municipal elections. With basic needs unmet for years, voters question the credibility of grand pledges and wonder which party truly deserves their trust amidst a flurry of assurances.
टॅग्स :Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिका