पाटोदा रस्त्यावरील पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:28+5:302021-02-05T06:04:28+5:30
खड्डे दुरुस्त करण्याची मागणी गंगाखेड : गंगाखेड- राणीसावरगाव रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांना होत आहे. गंगाखेड- ...

पाटोदा रस्त्यावरील पुलाची दुरवस्था
खड्डे दुरुस्त करण्याची मागणी
गंगाखेड : गंगाखेड- राणीसावरगाव रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांना होत आहे. गंगाखेड- सुप्पामार्गे पिंपळदरी या मार्गावरही खड्डे पडले आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाले आहेत. वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनांच्या चालकांना वळणावर समोरून येणारे वाहन लक्षात येत नाही. त्यातच खड्डे असल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बसच्या दुरुस्तीकडे सर्रास दुर्लक्ष
परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातील निम्म्यापेक्षा अधिक बसची बिकट अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरून धावणाऱ्या बसमध्ये सर्रास बिघाड होत असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतागृहाभावी महिलांची कुचंबणा
गंगाखेड : नेहरू चौक, शिवाजी चौक, सराफा बाजार या भागात स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. सराफा बाजारात मणी मंगळसूत्र, पोत, माळ विकण्यासाठी महिला मोठ्या संख्येने या बाजारात येतात. तसेच सोन्याचे, चांदीचे दागिने खरेदी व मोडीसाठी महिला येतात. सराफा बाजारातील महिलांची संख्या अधिक आहे. नगरपालिकेच्या वतीने या भागात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह बांधले नाही. त्यामुळे महिला ग्राहकांची कुंचबणा होत आहे.
विजेच्या भारनियमनास ग्रामस्थ वैतागले
पूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव व परिसरात मागील काही दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर विचारणा केल्यास महावितरणकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत.
पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा वाढला
परभणी : तालुक्यात पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वाळूमाफिया रात्री- अपरात्री वाळूचा उपसा करून वाहतूक करीत आहेत. ही वाळू प्रति ब्रास १० हजार रुपयांनी विक्री करीत असल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत.