फाैजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:48 IST2020-12-04T04:48:34+5:302020-12-04T04:48:34+5:30

पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये आयुब खान वली महम्मद खान (रा.फक्राबाद मोहल्ला, पाथरी) यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना जामीन मिळवून देण्यासाठी ...

A policeman suspended along with Faizdar | फाैजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित

फाैजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित

पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये आयुब खान वली महम्मद खान (रा.फक्राबाद मोहल्ला, पाथरी) यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके याने ५० हजार रुपये स्वीकारले. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात पोलीस शिपाई रमेश मुंढे याने जामीन मिळवून देण्यासाठी ज्ञानेश्वर दिलीपराव कोल्हे (रा.उमरा) यांच्याकडे होमगार्ड केशव दौलतराव मुंढे यांच्यामार्फत ३० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे न दिल्याने त्यांना बेकायदेशीररीत्या रात्रभर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. या दोन्ही बेकायदेशीर कृत्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली असून, दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत.

Web Title: A policeman suspended along with Faizdar