पोलीस ठाणे पुनर्रचनेचा प्रस्ताव २१ वर्षांपासून लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:12+5:302021-06-01T04:14:12+5:30
गंगाखेड तालुक्यातील भांबरवडी, महातपुरी, करम, उखळगाव, धारासूर, वंदन, उखळी, मानकादेवी ही गावे सोनपेठ पोलीस ठाणे अंतर्गत येतात.विशेष म्हणजे अंबरवाडी, ...

पोलीस ठाणे पुनर्रचनेचा प्रस्ताव २१ वर्षांपासून लालफितीत
गंगाखेड तालुक्यातील भांबरवडी, महातपुरी, करम, उखळगाव, धारासूर, वंदन, उखळी, मानकादेवी ही गावे सोनपेठ पोलीस ठाणे अंतर्गत येतात.विशेष म्हणजे अंबरवाडी, महातपुरी या दोन गावांना गंगाखेड येथील पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे, असे असतानाही ४० ते ३५ किलोमीटरचे अंतर कापत या दोन गावातील ग्रामस्थांना सोनपेठ येथील पोलीस ठाणे गाठावे लागते. तर दुसरीकडे करम, उक्कडगाव ही दोन गावे सोनपेठ तालुक्यात असून त्यांना गंगाखेड येथील पोलीस ठाणे गाठावे लागते. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास कमालीचा उशीर होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून तत्कालीन पोलीस अधीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सोनपेठ व गंगाखेड पोलीस ठाण्याची पुनर्रचना करून कमी अंतरावरच्या गावांना जवळच्या पोलीस ठाण्याशी जोडावे या मागणीचा प्रस्ताव १९९९ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला आहे; मात्र शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे मागील २१ वर्षांपासून हे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत. त्यामुळे सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील दहा ते वीस गावातील ग्रामस्थांना आर्थिक झळ सोसत दुसऱ्या तालुक्यातील पोलीस ठाणे गाठावे लागते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांची न्यायासाठी होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.