पर्यावणमंत्र्यांच्या स्वागताला प्लॅस्टिकचे गुच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:19 AM2019-06-23T06:19:46+5:302019-06-23T06:20:05+5:30

राज्यात प्लॅस्टिकला बंदी असताना स्वागताला चक्क प्लॅस्टिकचे गुच्छ आणल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम चांगलेच भडकले.

Plastic cluster on the welcome of environmentalists | पर्यावणमंत्र्यांच्या स्वागताला प्लॅस्टिकचे गुच्छ

पर्यावणमंत्र्यांच्या स्वागताला प्लॅस्टिकचे गुच्छ

Next

सेलू (जि़ परभणी) : राज्यात प्लॅस्टिकला बंदी असताना स्वागताला चक्क प्लॅस्टिकचे गुच्छ आणल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम चांगलेच भडकले. संयोजक व तहसीलदारांवर त्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने तहसीलदांना निरूत्तर होण्याची वेळ आली.
शिवसेनेच्यावतीने शनिवारी सेलू येथे शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते़ या वेळी पर्यावरणमंत्री कदम व राज्यमंत्री खोतकर यांचे स्वागत करण्यासाठी संयोजकांनी प्लास्टिकमधील पुष्पगुच्छ समोर आणले़
हे पुष्पगुच्छ पाहताच पर्यावरणमंत्री कदम यांचा पारा चढला़ त्यांनी उपस्थित तहसीलदार बालाजी शेवाळे यांना धारेवर धरत राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे़ पर्यावरणासाठी आम्ही एवढे काम करीत असताना तुम्ही प्लास्टिकचा वापर करताय, हे प्लास्टिक येते कोठून? प्रमुख अधिकारी म्हणून तुम्ही कारवाई का करत नाहीत? तुम्ही काय करता, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी झाडल्या़ त्यामुळे तहसीलदार शेवाळे हे निरुत्तर झाले़

Web Title: Plastic cluster on the welcome of environmentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.