पिंगळी- ताडलिमला रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:56+5:302021-02-05T06:06:56+5:30
पीक विमा न मिळाल्याने शेतकरी त्रस्त परभणी : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या काळात ...

पिंगळी- ताडलिमला रस्त्यावर खड्डे
पीक विमा न मिळाल्याने शेतकरी त्रस्त
परभणी : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या काळात काही शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत विमा नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विमा कंपनीविषयी संताप व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शहरातील सिग्नल दुरुस्तीची मागणी
परभणी : शहरातील मुख्य चौकात दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले सिग्नल सध्या धूळ खात पडून आहेत. सिग्नल दुरुस्ती संदर्भात मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून फारसा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे ही यंत्रणा शोभेची बनली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून, चौकात उभारण्यात आलेले सिग्नल सुरू करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
बाजारपेठ भागात वाहतुकीचा खोळंबा
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक शनिवारी या भागात आठवडी बाजार भरविला जातो. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी होते. प्रत्येक शनिवारी ही समस्या निर्माण होत असून, किमान बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेने उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रभागांतील सार्वजनीक हातपंप बंद
परभणी : शहरातील प्रत्येक प्रभागात बसविलेले हातपंप सध्या बंद आहेत. आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता, सार्वजनिक हातपंपांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागातील रस्त्याची कामे ठप्प
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू केलेली कामे निधीअभावी ठप्प आहेत. कोरोनाच्या संकटामुळे ही कामे बंद होती. आता या कामांसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांसाठी निधी उपलब्ध करुन कामे त्वरीत सुरू करावित, अशी मागणी होत आहे.
शैक्षणिक साहित्याच्या खरेदीला गर्दी
परभणी : जिल्ह्यात पाचवी ते आठवडीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी पालकांची गर्दी होत आहे. दफ्तर, वह्या, पुस्तकांच्या दुकानांवर पालकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे.