आमच्या खर्चासाठी पैसे दे, म्हणत तरुणाची हत्या; तिघांवर गुन्हा दाखल
By राजन मगरुळकर | Updated: June 23, 2023 13:05 IST2023-06-23T13:04:00+5:302023-06-23T13:05:43+5:30
तीन जणांनी केलेल्या मारहाणीत युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

आमच्या खर्चासाठी पैसे दे, म्हणत तरुणाची हत्या; तिघांवर गुन्हा दाखल
- मोहन बोराडे
सेलू : खर्चासाठी पैसे का देत नाहीस, या कारणावरून तीन आरोपींनी संगणमत करून एका बावीस वर्षीय युवकाचा केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध सेलू ठाण्यात गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सेलू शहरातील बाहेती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या जागेत बुधवारी रात्री घडली आहे.
यामध्ये तीन जणांनी केलेल्या मारहाणीत युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर उर्फ बाळू सुदाम शिंदे ( रा. राजीव गांधी नगर, सेलू) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी सखुबाई सुदाम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ यांनी भेट दिली. सेलू पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.